वेगवान नाशिक
नाशिक : जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिक ग्रामीण पोलीसांच्या हद्दीतील जानोरीतील औद्योगिक वसाहतीत तब्बल एक कोटी रुपयांचे अवैध बायोडिझेल जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे पोलीसांनी केलेल्या कारवाईने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
ट्विटर, फेसबुकनंतर आता गुगलनेही घेतला हा निर्णय
दरम्यान नाशिक ग्रामीण पोलीसांच्या हद्दीतील जानोरीतील औद्योगिक वसाहतीत अवैध बायोडिझेल निर्मितीच्या कारखान्यावर पोलीसांनी धाड टाकली असून कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 21 संशयित ताब्यात घेण्यात आले आहे. तर 11 गुन्हे दाखल केले आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अडचणीत वाढ
याबाबत नवनियुक्त पोलीस अधिक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईने अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहे. तसेच शहाजी उमाप यांनी ग्रामीण भागातील गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांनी चांगलीच कंबर कसली असून दिंडोरी येथील कारवाईने तर ग्रामीण भागासह शहरी भागात ग्रामीण पोलीस प्रमुखांच्या कारवाईचा डंका निर्माण झाला आहे.
यामध्ये ग्रामीण पोलीस दलाच्या माध्यमातून एका विशेष पथकाची स्थापना करण्यात आली असून त्यात अवैध धंदे उद्ध्वस्त करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीसांनी धडक मोहीम हाती घेतली असून एक कोटी रुपयांचे अवैध इंधन आणि पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.
ब्रेकिंग! नाशिकजवळ भूकंपाचे धक्के