वेगवान नाशिक
मुंबई : राज्यात सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यपालांवर टीकेची झोड उठली आहे. त्यातच आता महाराष्ट्रच्या राज्यपालांना पदावरून हटवण्यासाठी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना आज वाहन खरेदीचा योग
दरम्यान याचिकाकर्ते दीपक दिलीप जगदेव यांच्या वतीने ऍड नितीन सातपुते यांनी ही याचिका दाखल केली असून मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आहे. लवकरच या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
ब्रेकिंग! नाशिकजवळ भूकंपाचे धक्के
तसेच वर्तमान राज्यपालांनी जनतेतील एकोपा आणि शांतता बिघडवल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 61 आणि 156 अंतर्गत महाभियोगाची कार्यवाही करावी अशी मागणी केली जात आहे. तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या कलम 19 अंतर्गत बंधने काय ? असा सवालही याचिका कर्त्यांनी उपस्थित केला आहे.