वेगवान नाशिक
मुंबईः राज्यात सध्या सत्तापालट झाले असून त्यात मुंबई महापालिका निवडणुका कुठल्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या सर्व पक्ष निवडणुकीसाठी जोरदार तयारीला लागले आहेत.अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर जाणार असल्यानं राजकीय वर्तळात चर्चेला उधाण आले आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना आज वाहन खरेदीचा योग
यासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला असून त्यात त्यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले, आज मी बिहार दौऱ्यावर आहे, ते उपमुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत. त्यामुळे क्लाईमेंट चेंज आणि पर्यावरण या विषयावर चर्चा करू. मला त्या घाणेरड्या राजकारणात जायचे नाही, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचे कौतुक केले.
तसेच आजची मंत्रीमंडळ बैठक रद्द करण्यात आली. कारण, एक पक्ष दुसऱ्या राज्याच्या प्रचारात व्यस्त आहे. त्यांनी आधी आमदार, मग प्रकल्प आणि आता मंत्री गुजरातला पाठवले. महाराष्ट्रात बेरोजगार, ओला दुष्काळ असे असंख्य प्रश्न असताना मंत्रिमंडळ तिकडे प्रचारात व्यस्त आहे. महाराष्ट्रासाठी एक तास दिला असता तर काही वाईट झाले नसते, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे गट आणि शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला.
ब्रेकिंग! नाशिकजवळ भूकंपाचे धक्के