वेगवान नाशिक
नाशिकः बुधवारी पहाटे महाराष्ट्रातील नाशिकमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला असून भूकंपाची तीव्रता ३.६ रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिली आहे. माहितीनुसार, नाशिकच्या पश्चिमेला ८९ किमी अंतरावर पहाटे ४ वाजता पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली टेक्टोनिक प्लेट्सची हालचाल जाणवली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांना आज वाहन खरेदीचा योग
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची खोली जमिनीखाली 5 किमी होती. याबाबत नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज पहाटे 04:04 वाजता महाराष्ट्रातील नाशिकपासून 89 किमी पश्चिमेला 3.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यासंबंधी अधिक माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे.
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स 450 अंकांनी तर निफ्टी18,300 अंकांनी उसळी
याआधी १२ नोव्हेंबरला राष्ट्रीय राजधानीत भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यावेळी रात्री ८ वाजता दिल्लीत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, नेपाळमध्ये संध्याकाळी ७.५७ वाजता ५.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. तसेच भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून १० किमी खाली असल्याचं सांगण्यात आलं.
दरम्यान भारतात जानेवारी ते सप्टेंबर या ९ महिन्यांत ९४८ वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. हा काही मोठ्या धोक्याचा इशारा आहे का? जेव्हा भूकंपाची तीव्रता ४ पेक्षा कमी असते तेव्हा ते सहसा जाणवत नाहीत. गेल्या ९ महिन्यांत भारतात असे २४० भूकंप जाणवले, ज्याची तीव्रता ४ पेक्षा जास्त होती.
2023 च्या बजेटमध्ये सरकार करू शकते मोठे बदल, करदात्यांवर काय परिणाम होणार