प्रवाशावर माथेफिरूचा ऍसिड हल्ला,माथेफिरू घेतला ताब्यात


वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे,

मनमाड,नांदगाव-

पवन एक्सप्रेस या रेल्वेने नाशिकहून बसलेले आर्मीचे जवान शिवशंकर त्रिवेदी यांच्यावर एका वयस्कर माथेफिरूने ऍसिड फेकून हल्ला केल्याची घटना घडली आहे.यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली आहे.

प्रवाशांमध्ये खळबळ उडाल्यामुळे मनमाड रेल्वे स्थानकावर गाडी आल्यानंतर माथेफिरूला पकडण्यासाठी गेलेल्या आरपीएफ जवानावर देखील ऍसिड फेकण्याचा प्रयत्न केला.यामध्ये आरपीएफ जवान व प्रवासी गंभीर जखमी झाला.

हा वयस्कर माथेफिरू इसम रेल्वेच्या टॉयलेट मध्ये बसलेला होता.त्याला बाहेर काढण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले.जीआरपी,आरपीएफच्या मदतीने त्याला बाहेर काढून ताब्यात घेण्यात आले.

त्यामुळे पवन एक्सप्रेस मात्र 20 ते 25 मिनिटे उशिरा मनमाड स्टेशनवरून पुढच्या प्रवासाला रवाना झाली.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *