शिंदे-फडणवीस सरकार पडणार; संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले..


वेगवान नाशिक

नवी दिल्लीः येत्या काही दिवसात शिंदे-भाजप सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा दुसरा टप्पा पार पडणार आहे. त्यानंतर सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी नाट्य रंगणार असल्याच्या चर्चा आहेत. या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी मोठा दावा केला असून शिंदे-भाजप सरकार 100 टक्के पडणार असं म्हटलं आहे.

आजचे राशी भविष्यः या राशींच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची संभावना

तसेच  शिंदे भाजप  पडणार, लवकरच मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचे संकेत महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी दिले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांणा उधाण आलं आहे.

याबाबत औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सिरजगाव येथील एका प्रकल्पाच्या शुभारंभ प्रसंगी रावसाहेब दानवे बोलत होते त्यावेळी  ते म्हणाले, ‘ महाविकास आघाडीचे सरकार जाईल असे कुणालाही वाटत नव्हते. मात्र अशी जादू झाली की अडीच वर्षात सरकार कोसळले. यामुळे उद्या नेमकी राजकीय परिस्थिती काय असेल याचा अंदाज बांधता येत नाही.

Nashik मुंबई, मालेगावपाठोपाठ नाशिक शहरातही गोवरचा धोका

त्यात सध्याची राजकीय परिस्थिती गोंधळलेली आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. त्यामुळे जनतेची कामे करा, असा सल्ला रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिला आहे. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, रावसाहेब दानवे कधी कधी खरं बोलून दाखवतात. दोन महिन्यानंतर काहीही होऊ शकतं. म्हणजे सरकार पडू शकतं म्हणजेच त्यांनी मध्यवधीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे  हे सरकार 100 टक्के पडतंय, खात्री आहे, असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

Gold-Silver Price Today सोने चांदीच्या दरात वाढ

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *