वेगवान नाशिक
मुंबईः गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी हे भारत जोडो यात्रा घेऊन महाराष्ट्रात दाखल झाले आहे. तर राहुल गांधींच्या भारत जोडो या यात्रेचा महाराष्ट्रातील समारोप जळगाव जामोदमध्ये होणार होता, आता भारत जोडो यात्रेचा मुक्काम दोन दिवस वाढला असून ही यात्रा मध्यप्रदेशमधून सुरु होणार आहे. त्यात आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी ‘भारत जोडो यात्रे’वर आरोप करत राहुल गांधींवर टीका केली आहे.
आजचे राशी भविष्यः या राशींच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची संभावना
ते म्हणाले, तामिळनाडूतून सुरु झालेल्या ‘भारत जोडो यात्रेत अनेक कलाकरांनी हजेरी लावली. मात्र, यात्रेत सहभागी होण्यासाठी पैसे देऊन आणले जात असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. तसेच भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने नौंटकी सुरु असून या यात्रेत दिसणारे कलाकार पैसे देऊन आणले आहे. याबाबत भारत जोडो यात्रेच्या टीमकडून एक मॅसेज पाठवल्याचं समोर आलं आहे.
राज्यात पोषक वातावरणामुळे औद्योगिक गुंतवणुकीत वाढ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
त्यामुळे या यात्रेत १५ मिनिटे चालून राहुल गांधींना पाठिंबा देणारे कलाकार पैसे देऊन आणण्यात आले का?,” असा सवाल नितेश राणेंनी उपस्थित केला आहे. तसेच, नितेश राणेंनी एक ट्विटही केलं आहे. त्यात व्हॉट्सअप मेसेजचा स्क्रीनशॉट त्यांनी शेअर केला आहे. त्यामध्ये नितेश राणेंनी लिहलं की, भारत जोडो यात्रेत राहुल गांधींबरोबर चालण्यासाठी कलाकारांना किती पैसे दिले जातात, याचा हा पुरावा. सब गोलमाल है भाई, हा पप्पू कधी पास नाही होणार, असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे.
शिंदे-फडणवीस सरकार पडणार; संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले..