नाशिकः शहरातील नामांकित कॉलेजच्या २१ वर्षीय तरुणाची आत्महत्या


वेगवान नाशिक

नाशिक : शहरात दिवसेंदिवस तरुणाच्या आत्महत्यांचे  प्रमाण वाढत आहेत. अशातच नाशिक शहरातील नामांकित महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये  एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. गौरव रमेश बोरसे (वय २१) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात असलेल्या डागसौंदाना येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकारामुळे महाविद्यालय  परिसरात खळबळ उडाली आहे.

आजचे राशी भविष्यः या राशींच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची संभावना

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शहरातील गंगापूर रोड परिसरामध्ये असलेल्या KTHM या नामांकित महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये टी वाय बी कॉम मध्ये गौरव शिकत होता. त्यादिवशी सकाळच्या सुमारास महाविद्यालयाच्या हॉस्टेलमधीलच गौरवच्या रुमच्या शेजारील रूममध्ये राहणारा एक मुलगा इस्त्री मागण्यासाठी गौरवकडे गेला त्यावेळी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या स्टॉकने 4 वर्षात 1 लाखांचे झाले 65 लाख

मात्र गौरवने आत्महत्या करून जीवन संपवण्यासारखा निर्णय का घेतला? असा प्रश्न महाविद्यालय प्रशासनासह विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना पडला असून त्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

याबाबत पोलिसांना कळवण्यात आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला आहे. या प्रकरणी अधिक तपास सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.

शिंदे-फडणवीस सरकार पडणार; संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले..

 

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *