वेगवान नाशिक
लासलगाव : सध्या वाढत्या महागाईमुळे सर्वच वस्तूंचे दर वाढलेले असताना कांदा या पिकांचे दर घसरले आहे. त्यात १ नोव्हेंबर रोजी सरासरी २ हजार ५५१ रुपये प्रति क्विंटलने विक्री झालेला कांदा आज सरासरी १ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलने विकण्याची वेळ कांदा उत्पादकांवर आलेली आहे. त्यामुळे कांदा उत्पादकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
आजचे राशी भविष्यः या राशींच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची संभावना
त्यातली त्यात अवघ्या २० दिवसात कांद्याचे दर सुमारे ५० टक्क्यांनी घसरले असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. कारण चांगला दर मिळेल या अपेक्षेने साठविलेले उन्हाळी कांदा हा मोठ्या प्रमाणात खराब होत आहे. त्यामुळे शेतक-याच्या चिंतेत वाढ होताना दिसत आहे.
राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाचा मनमाडला निषेध
गुजरातमध्ये निवडणूक आणि महाराष्ट्रात 1 दिवस सुट्टी, सरकारने जारी केला आदेश