Nashik मुंबई, मालेगावपाठोपाठ नाशिक शहरातही गोवरचा धोका


वेगवान नाशिक

नाशिक : सध्या मुंबईत गोवरचे रुग्ण वाढत असून त्यात आता मुंबई मालेगाव पाठोपाठ नाशिक शहरात देखील गोवरचे चार संशयित रुग्ण सापडल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये काही दिवसांपूर्वी गोवरचे रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे शहराच्या वेशीवर असलेल्या या आजाराने आता शहरात प्रवेश केल्याचा संशय निर्माण झाला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशींच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची संभावना

दरम्यान मालेगावमध्ये गोवरचे रुग्ण आढळून आल्यानंतर जिल्ह्यातील गोवरचा धोका आता अधिक वाढला असून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा या अलर्ट मोडवर आल्या आहेत. तसेच आरोग्य विभागाने शहरात केलेल्या तपासणीत गोवरचे चार संशयित रुग्ण आढळून आले असल्याने त्या संशयित बालकांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबईला पाठवण्यात आले आहे.

नाशिकः कांद्याच्या भावात इतक्या टक्क्यांनी घसरण

तसेच या संशयित चार बालकांचे रिपोर्ट आल्यानंतर आरोग्य विभाग नाशिक शहरात सर्वेक्षण करणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. तसेच गोवरचे संशयित रुग्ण आढळल्याने नागरिकांनी आपल्या लहान बालकांची काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

याबाबत सांगण्यात येत आहे की, गोवर हा संसर्गजन्य आजार असून तो लहान बालकांना अधिक होत असल्याने रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आहे. मुंबईमध्ये गोवरचा उद्रेक झाल्यानंतर त्या पाठोपाठ मालेगावमध्ये रुग्ण आढळले आणि आता नाशिक शहरात संशयित आढळून आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह नागरिकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.

Gold-Silver Price Today सोने चांदीच्या दरात वाढ


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *