वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे,
मनमाड,नांदगाव-
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे आयोजित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषद,नाशिक यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या नांदगाव तालुकास्तरीय 19 वर्ष आतील मुलांच्या कबड्डी स्पर्धा मांडवड येथे पार पडल्या.
19 वर्षाखालील विद्यार्थ्यांच्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये मनमाड कनिष्ठ महाविद्यालय आणि बोलठाण हायस्कूल या संघात अंतिम लढत झाली व मनमाड कनिष्ठ महाविद्यालयाने एकतर्फी विजय संपादन करत विजेतेपद पटकावले.मनमाड कनिष्ठ महाविद्यालय हा संघ आता जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी पात्र झाला आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण पाटील,वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.प्रमोद आंबेकर,कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य ज्योती पालवे,क्रीडा शिक्षक महेंद्र वानखेडे सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.