राज्यात पोषक वातावरणामुळे औद्योगिक गुंतवणुकीत वाढ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


वेगवान नाशिक

मुंबई : देशात आणि राज्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक येण्यासाठी सध्या अतिशय पोषक वातावरण असून महाराष्ट्रातही इलेक्ट्रॉनिक वाहनेसौर ऊर्जा तसेच पर्यायी ऊर्जा यांसारख्या क्षेत्रात वाढ होत आहे. उद्योगांसाठी आवश्यक सर्व पायाभूत सुविधाही अधिक निर्माण करण्यात येत असल्याने महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक सातत्याने वाढत आहे. या सर्व प्रयत्नांमध्ये गुंतवणूक वाढीसाठी सीए‘ समुदाय मोठा वाटा उचलू शकतो, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आजचे राशी भविष्यः या राशींच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची संभावना

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आयसीएआय (ICAI) द्वारे आयोजित 21व्या जागतिक लेखापाल परिषदेचे आयोजन आपल्या देशात आणि विशेषतः देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत करण्यात आले ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. या मंचाद्वारे सामाजिकआर्थिक आणि पर्यावरणीय विषयांबाबतही उहापोह झाला. आकर्षित करणारा सीएचा अभ्यासक्रम असून लेखापालन क्षेत्रात तरुणांसाठी करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. प्रामाणिक करदात्यांना न्याय मिळावायासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. म्हणुनच अर्थव्यवस्थेला त्याव्दारे बळकटी देण्याचे कामच आपण करत आहात, असेही श्री. फडणवीस म्हणाले.

Gold-Silver Price Today सोने चांदीच्या दरात वाढ

त्यानंतर फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचे इंजिन आहे. देशात जीएसटी संकलनात राज्याचा वाटा सर्वात मोठा आहे. राज्यातील जीएसटी करसंकलनात वाढ झाली आहे. तसेच करदात्यांच्या तक्रारींचे निराकरणही त्वरित करण्यात येत असून पायाभूत सुविधानावीन्य आणि तंत्रज्ञान यांचा मेळ असणारे मॉडेल सर्वसमावेशक असल्याने राज्यातील पायाभूत सुविधांसाठी विविध प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत.

तसेच  स्पीड ऑफ ट्रॅव्हल‘ आणि स्पीड ऑफ डेटा‘ यावर अधिक भर देण्यात येत असून शासनाने रस्तेमेट्रो आणि दळणवळणांच्या इतर माध्यमांना बळकट करण्यात विशेष लक्ष दिले आहे. वेगाने विकास करताना महाराष्ट्रात पोषक औद्योगिक वातावरण निर्माण केले असल्याचेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

कँडल मार्च काढत श्रद्धा वालकर हत्याकांडाचा जळजळीत निषेध

 

 

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *