नाशिक मुंबई महामार्ग सहापदरी काँक्रिटचा करण्याची छगन भुजबळांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे मागणी


वेगवान नाशिक

नाशिक: मुंबई आग्रा महामार्ग नाशिक ते वडपे हा रस्ता सहापदरी काँक्रिट रस्ता करण्यात यावा आणि हे काम सुरू होईपर्यंत या रस्त्याचे संपूर्ण नुतनीकरण करण्यात यावे अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. याबाबत छगन भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र दिले आहे.

आजचे राशी भविष्यः या राशींच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची संभावना

छगन भुजबळ यांनी नितीन गडकरी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आपण ४ ऑक्टोबर २०१४ रोजी नाशिक मधील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणीच्या कार्यक्रमात नाशिक ते वडपे हा सहापदरी काँक्रीटचा करण्याची घोषणा केलेली होती. त्यामुळे लवकरात लवकर हे सहापदरी काँक्रिट रस्त्याचे काम मंजूर केले जावे.

Nashik मुंबई, मालेगावपाठोपाठ नाशिक शहरातही गोवरचा धोका

तसेच नाशिक ते मुंबई हा फोर लेन रस्ता असून  या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. त्यामुळे  शहापुर ते वडपे परिसरातील अत्यंत रहदारीच्या परिसरात कुठलेही उड्डाणपूल नसल्याने याठिकाणी वाहतुकीसाठी नेहमीच अडथळा  निर्माण होतो. त्यामुळे नाशिक ते वडपे हा रस्ता सहापदरी होणे अतिशय आवश्यक आहे. मात्र या सहापदरी रस्त्याचा डी.पी.आर मंजूर करून प्रत्यक्ष काम सुरु व्हायला शासनाच्या लाल फितीच्या कारभारामुळे विलंब होणार आहे. या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे नुतनीकरण होईपर्यंत रस्त्याच्या संपूर्ण लांबी मधील कामाचे तात्काळ नुतनीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे भुजबळांनी म्हटले आहे.

राज्यात पोषक वातावरणामुळे औद्योगिक गुंतवणुकीत वाढ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

त्यानंतर ते पुढे म्हणाले की, या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सन २०१४ मध्ये झालेले आहे. टोलवसुली कंत्राटदराने दर पाच वर्षाने या रस्त्याचे संपूर्ण बळकटीकरण करण्याची अट या कामाच्या आदेशात आहे. मात्र संबधीत कंपन्यांकडून करारातील स्पेसिफिकेशनप्रमाणे सुधारणा केली जात नसल्यामुळे या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यात रस्त्यात अनेक ठिकाणी उंचवटे व खोलगट भाग तयार झाल्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सहापदरी रस्त्याचे प्रत्यक्ष काम होईपर्यंत या संपूर्ण रस्त्याचे नुतनीकरण करण्याचे काम तातडीने हाती घेण्यात यावे अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली आहे.

Gold-Silver Price Today सोने चांदीच्या दरात वाढ


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *