सोनाली फोगट हत्येप्रकरणी सीबीआयच्या आरोपपत्रातून मोठा खुलासा


वेगवान नाशिक

गेल्या काही महिन्यांपूर्वी सोनाली फोगट यांची हत्या झाल्याचं प्रकरण घडलं असून हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आलं होत. त्यानंतर सोनाली यांचा पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांच्यावर जबरदस्तीने ड्रग्ज देऊन त्यांची हत्या केल्याचा आरोप होता. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती. तर या हत्येप्रकरणी आता सीबीआयने गोवा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे.

आजचे राशी भविष्यः या राशींच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची संभावना

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीबीआयने सोनाली फोगाट यांचे पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांच्याविरोधात गोवा कोर्टात आरोपपत्र दाखल केलं आहे. यापूर्वी गोवा पोलीस सोनालीच्या हत्येचा तपास करत होते. नंतर हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं असून सोनाली यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पीए सुधीर सांगवान आणि सुखविंदर यांच्यावर हत्येचा आरोप केला आहे.

या स्टॉकने 4 वर्षात 1 लाखांचे झाले 65 लाख

यामध्ये  कुटुंबीयांनी पीए सुधीर सांगवान आणि मित्र सुखविंदर यांच्यावर फोगाट यांना विष देऊन मारल्याचा आरोप केला होता. यासोबतच गोवा पोलीस या प्रकरणाचा योग्य तपास करत नसल्याचाही आरोप केला. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात येऊन कुटुंबासोबतच हरियाणा सरकारनेही सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर गोवा सरकारनं या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता.

दरम्यान सीबीआयने तपासादरम्यान गोवा पोलिसांनी तयार केलेल्या ५०० हून अधिक पानांच्या कागदपत्रांची तपासणी केली होती. इतकेच नाही तर CBI ने सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांच्यासोबत कर्लीज बारमध्ये सीन रिक्रिएट देखील केला. त्यात सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांच्यावर या कर्लीज बारमध्ये सोनाली फोगटला ड्रग्ज दिल्याचा आरोप आहे. या संपूर्ण तपासानंतर सीबीआयनं न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे.

Gold-Silver Price Today सोने चांदीच्या दरात वाढ


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *