वेगवान नाशिक
नवी दिल्ली : सध्या केंद्र सरकारकडून येणा-या २०२३ च्या अर्थसंकल्पाचे बजेट सादर करण्याची तयारी सुरू असून त्यात काही महत्वाचे निर्णय घेण्यात येणार आहे. तर यामध्ये येत्या अर्थसंकल्पात तुम्हाला दिलासा मिळेल का? की पुन्हा पडणार महागाईचा मार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आजचे राशी भविष्यः या राशींच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची संभावना
याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पाविषयी मंथन झाले असून व्हर्च्युअल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पूर्व बैठकांचे आयोजन करण्यात येऊन त्यामाध्यमातून नियोजन करण्यात येणार आहे. दरम्यान आगामी अर्थसंकल्पाच्या या मॅरेथॉनची लगबग सुरु होण्याच्या अगोदरच केंद्रीय अर्थमंत्रालयानेच प्राप्तिकरांचा दर कमी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे करदात्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
शिंदे-फडणवीस सरकार पडणार; संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले..
तसेच या बैठकांच्या सत्रात केंद्रीय अर्थमंत्री अगोदर कॉर्पोरेट सेक्टरच्या मागण्यांचा विचार करतील. त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर आणि हवामान बदलासंबंधीच्या संघटना यांचे म्हणणे ऐकून घेतील. त्याआधारे अर्थसंकल्पात काही गोष्टींना प्राधान्य देण्यात येईल. तसेच
या मॅरेथॉन बैठकांपूर्वीच भारतीय उद्योग परिसंघाने (CII) त्यांच्या मागण्यांचा, सूचनांचा प्रस्ताव केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे पाठविला आहे. त्यामुळे एकंदरीतच दोन महिन्यात अर्थसंकल्पाविषयी मोठ्या घडामोडी घडणार आहे.
राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेबाबत नितेश राणेंचा गंभीर आरोप
यामध्ये CII ने पण व्यक्तिगत आयकर कमी करण्याची मागणी केली असून याविषयीचा तसा प्रस्ताव त्यांनी दिला आहे. तर आयकर कमी झाल्यास त्याचा फायदा जवळपास 5.83 कोटी करदात्यांना होणार आहे. तसेच याआधी केंद्रीय अर्थमंत्रालयानुसार, ऑक्टोबर 2022 मध्ये एकूण 1,51,718 कोटी रुपयांची जीएसटी वसुली झाली असून एप्रिल, 2022 मध्ये सर्वाधिक जीएसटी वसुली झाली होती. त्यावेळी केंद्र सरकारला 1.50 लाख कोटींची कर प्राप्ती झाली होती.
या स्टॉकने 4 वर्षात 1 लाखांचे झाले 65 लाख