मुंबई आग्रारोडवर ट्रकची कारला धडक, चांदवड पोलिसात गुन्हा दाखल


वेगवान नाशिक

चांदवडः मुंबई आग्रारोडवर राहुड घाटात कार व ट्रक यामध्ये धडक झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी चांदवड पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशींच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची संभावना

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आग्रारोडवर राहुड घाटात म्हसोबा मंदिराच्या पुढे मालेगावकडे जाणा-या बाजूने ट्रक (क्र. यूपी ७० इटी ९६५५) याचा ड्रायव्हर व आरोपी  (थानेश्वर श्रीरामपूर उजवा जयसिंगनगर मध्यप्रदेश) याने आपल्या ताब्यातील ट्रकने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने ट्रक चालवून त्याच्या पुढ्यात चालणा-या अल्टो कार (क्र. एम एच १८ एजे ४७२१) हिला पाठीमागून धडक मारली आहे.

नाशिकः कांद्याच्या भावात इतक्या टक्क्यांनी घसरण

या धडकेत अल्टो कारच्या नुकसानीसह कारमधील व्यक्तींच्या किरकोळ दुखापतीस व डोक्यास, मानेस व कमरेस मार लागल्याने तुकाराम लक्ष्मण खंदरकर (रा. मुगलई गवळी वाडा धुळे) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चांदवड पोलिस स्टेशन येथे गुन्हा नं ४३०, आब्लिक २०२२,भादवि. कलम २७९, ३३७, ३३८, ४२७ व मोटर वाहन कायदा १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास चांदवड पोलिस कर्मचारी करत आहे.

Nashik मुंबई, मालेगावपाठोपाठ नाशिक शहरातही गोवरचा धोका


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *