वेगवान नाशिक
राज्यात सध्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. शिंदे गटासह उद्धव ठाकरे गटदेखील आक्रमक झाला असून आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये राज्यपाल कोश्यारी यांच्याविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी पैशांवर काबू ठेवा..
त्यावेळी महाराष्ट्राचे पाणी साधे नसून आम्ही राज्यपाल कोश्यारी यांना पाणी पाजल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा अंबादास दानवे यांनी दिला आहे. तसेच शिवसेना राज्यभरात आंदोलन करत आहे.
दरम्यान कोश्यारी महाराष्ट्रातील महापुरूषांविषयी विधाने करत आहेत. कोश्यारी दिल्लीतील बादशहाच्या इशाऱ्यावर अशी वक्तव्ये करतात का? ते महाराष्ट्राची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. त्यानंतर दानवे म्हणाले, राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर काही लोक गळा काढत होते. मात्र काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले. त्यानंतर ते रस्त्यावर उतरले नाहीत. म्हणजेच त्यांचे हिंदुत्व हे बेगडी आहे, अशी टीका दानवे यांनी केली असून ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर करतात का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय.
Share Marketशेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स 250 अंकांनी, तर निफ्टी ६१ अंकांनी घसरण