या कारणांमुळे वाढू शकतं तुमचं वजन, जाणून घ्या


वेगवान नाशिक

सध्याच्या धावपळीच्या जीवनात अनेक जणांचे शरीराकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे बरेचजणांचे वजन वाढले जाते. या वाढत्या वजनामुळे अनेक त्रस्त झालेले दिसतात, वजन कमी करण्यासाठी काही ना काहीतरी उपाय शोधत असतात. पण वजन वाढण्यामागे काही कारणे देखील असतात, जसे वय वाढतं तशा आपल्या शारीरिक हालचाली कमी होऊ लागतात. तुमची धावपळ, खेळणं आणि उड्या मारणंही जवळपास थांबतं. संथपणे काम करणं, अशा अनेक कारणांमुळे आपलं वजन वाढत असतं.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी पैशांवर काबू ठेवा..

पण जर तुमचं वजन अचानक वाढलं असेल तर ते शरीरासाठी सामान्य नाही. यामागे हार्मोनल असंतुलन, थायरॉईड किंवा इतरही अनेक कारणे असू शकतात. चला तर मग जाणून घेऊया वजन वाढण्यामागील कारणे.

हायपोथायरॉइडिजम- जेव्हा एखाद्या महिलेचे वजन अचानक वाढते, तेव्हा डॉक्टर त्यांना सर्वप्रथम थायरॉईडची चाचणी करण्यास सांगतात. आपल्या गळ्यात एक छोटी ग्रंथी असते, जी मेटाबॉलिजम नियंत्रित करणाऱ्या हार्मोनचे उत्पादन करण्यास कारणीभूत असते. जर तुमचा थायरॉईड कमी सक्रिय असेल तर मेटाबॉलिजम कमी होऊ शकतो व वजन वाढू शकतं.                      मेनोपॉज-  पेरीमेनोपेज फेजमध्ये विविध प्रकारचे बदल होतात. त्यामुळे, इस्ट्रोजेन हे हार्मोन अनियमित पद्धतीने वाढते किंवा कमी होते. यामुळे वजन तर वाढतेच, शिवाय हॉट फ्लॅशेस, लैंगिक इच्छा कमी होणे, पाळी अनियमित येणे इत्यादी बदलही होतात. यामुळे स्नायू सैल होऊन  शरीरातील चरबी वाढू शकते.

Share Marketशेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स 250 अंकांनी, तर निफ्टी ६१ अंकांनी घसरण

पीसीओएस- एका अहवालानुसार 5 पैकी 1 महिलेला कधी ना कधी पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचा (PCOS) त्रास होतो. हे हार्मोनल असंतुलन असून त्यामुळे इस्ट्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉन या पुनरुत्पादक हार्मोन्सचे संतुलन बिघडते. यामुळे महिलांची पाळी अनियमित होते, तसेच ब्लड शुगर लेव्हलवरही परिणाम होतो. त्यामुळे शरीराचे वजन वाढू लागते.                                          स्ट्रेस- जेव्हा तुम्ही तणावात असता तेव्हा ॲड्रेनेलिन ग्रंथींवर परिणाम होतो. कॉर्टिसॉल हार्मोनचा स्राव जास्त होऊ लागतो. यामुळे शरीरातील ऊर्जा आणि चरबी दोन्ही साठून राहतात.आणि मग यामुळे वजनही वाढू लागतं.

लहान आतड्यांमधील जीवाणू वाढणे- जेव्हा चांगले बॅक्टेरिया आणि वाईट बॅक्टेरिया यांचे संतुलन बिघडते, तेव्हा लहान आतड्यात जीवाणूंची वाढ होऊ शकते. यामुळे आतड्यांना सूज येणे, ओटीपोटात दुखणे, अतिसार यासह गॅसेसही निर्माण होऊ शकतात. यामुळेही तुमचं वजन अचानक वाढू शकतं.                                                                                                                           झोप पूर्ण न होणे- चांगली झोप लागणे हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. त्याचा वजनावरही मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. त्यामुळे अपुऱ्या झोपेमुळेही वजनावर परिणाम होतो.                                                                                              हायड्रेटेड न राहणे- जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी प्यायले नाही, तर वजन वाढणे अपरिहार्य ठरते. यामुळे शरीरातून विषारी पदार्थ अथवा टॉक्सिन्स हे बाहेर टाकले जात नाहीत, त्यामुळे विविध आजार होतात.

शहरात मतदार नोंदणी,आधार लिंक कारणासाठी विशेष अभियान

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *