वेगवान नाशिक
मुंबई: आज आठवड्याच्या सुरूवातीलाच शेअर बाजारात रमाई दिसून आली असून शेअर बाजाराची सुरुवात घसरणीने झाली आहे. सेन्सेक्स २०७ अंकांच्या घसरणीसह ६१,४५६ अंकांवर तर निफ्टी ६१ अंकांच्या घसरणीसह १८,२४६ अंकांवर उघडला आहे. तर बँक निफ्टीमध्ये १५० अंकांच्या घसरणीसह ४२,२८६ अंकांच्या पातळीवर व्यवहार सुरू झाला.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी पैशांवर काबू ठेवा..
आज सुरुवातीच्या व्यवहारात बाजारावर दबाव दिसून येत असून SGX निफ्टीने ९५ अंकांची घसरण नोंदवली आणि सध्या १८,२५० अंकांवर व्यवहार करत आहे.त्यात डाऊ फ्युचर्सही दबावाखाली असून त्यात सुमारे १०० अंकांची घसरण झाली आहे. तसेच कच्च्या तेलाच्या किमतीतील कमजोरीही कायम आहे. सध्या जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत ८७ डॉलर प्रति बॅरल आहे.
शहरात मतदार नोंदणी,आधार लिंक कारणासाठी विशेष अभियान
सुरुवातीच्या १० मिनिटांच्या आत, बाजारातील घसरण आणखी खोलवर गेली आणि सेन्सेक्समधील ३० पैकी केवळ पाच समभाग तेजीत आहेत तर २५ शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. त्याच वेळी, निफ्टी समभागांपैकी ५० समभागांमध्ये केवळ १३ समभाग वाढीसह व्यवहार करत असून ३७ समभागांमध्ये घसरण होत आहे.
नाशिकः मराठा समाजाला १०% आणि ओबीसींना हक्काचे २७%आरक्षण देण्याची मागणी- छगन भुजबळ
आज बाजारातील सर्व क्षेत्रीय निर्देशांक घसरणीच्या लाल चिन्हात व्यवहार करत आहेत. आयटी समभागांमध्ये कमाल १.०३ टक्के आणि रियल्टी समभागांमध्ये ०.९८ टक्के कमकुवतपणा दिसून येतो. ग्राहक टिकाऊ वस्तू निर्देशांक ०.४५ टक्क्यांनी आणि धातूचा शेअर ०.७३ टक्क्यांनी घसरला आहे. दरम्यान, बँक निफ्टी देखील आज बाजाराच्या क्षेत्रीय निर्देशांकात घसरणीसह व्यवहार करत आहे आणि १७५ अंकांनी घसरल्यानंतर ४२,२६३ च्या पातळीवर आहे.
व्हॉट्सअॅपने आणलेय नवीन फीचर, घरबसल्या करता येणार खरेदी, कसे जाणून घ्या