वेगवान नाशिक
देशात सध्या बॅंकेतर्फे नवनवीन योजना राबविल्या जात आहे. त्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी सतत नवनवीन योजना येत असतात. अशातच आता देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली असून याअंतर्गत आता एसबीआय ग्राहकांना त्यांची पेन्शन स्लिप इन्स्टंट मेसेजिंग अॅप प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲपद्वारे मिळू शकते.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी पैशांवर काबू ठेवा..
याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विट करून माहिती दिली आहे. त्यासाठी तुम्हाला एक नंबर दिला जाईल त्यावर मेसेज पाठवावा लागणार आहे. तसेच एवढेच नाही तर स्टेट बँकेच्या या सेवेद्वारे तुम्हाला बॅलन्स आणि मिनी स्टेटमेंटचीही माहितीही मिळू शकते. यासाठी ग्राहकांना प्रथम नोंदणी करावी लागेल.
राज्यपालांची पाठराखण केल्यानंतर संजय राऊतांची देवेंद्र फडणवीसांवर टीका
तसेच या सेवेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची समस्या नाही. जेव्हा तुम्ही मेसेज पाठवता तेव्हा तुम्हाला बँकेकडून तीन पर्याय दिले जातील. या पर्यायांमध्ये बॅलन्स इन्क्वायरी, मिनी स्टेटमेंट आणि पेन्शन स्लिप यांचा समावेश असेल. आणि जर तुम्हाला पेन्शन स्लिप हवी असेल तर येथे तुम्हाला पेन्शन स्लिप पर्याय निवडावा लागेल. यानंतर, ज्या महिन्यासाठी स्लिप आवश्यक आहे तो महिना तुम्हाला टाकल्यानंतर तुम्हाला पेन्शन डिटेल प्रोसेस करण्यासंबंधी एक मेसेज मिळेल आणि मग तुम्हाला तुमची पेन्शन स्लिप मिळेल. अशा प्रकारे तुम्ही या सेवांचा लाभ घेऊ शकणार आहे.
Share Marketशेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स 250 अंकांनी, तर निफ्टी ६१ अंकांनी घसरण