वेगवान नाशिक
राज्यात सध्या वातावरण चांगलचं तापल आहे. अनेक नेत्यांकडून राजकारणात संतप्त प्रतिक्रिया दिसून येत आहे. त्यात सध्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी पैशांवर काबू ठेवा..
त्यामुळे आज तुमचे राज्यपाल, तुमचे प्रवक्ते शिवरायांचा अवमान करणारी वक्तव्ये करत असून देखील तुम्ही त्यांचा बचाव करत आहात. म्हणजेच तुमचे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रासंदर्भातील त्यांचे प्रेम खरे नाही, अशी टीका संजय राऊतांनी केली असून महाराष्ट्रातील जनता राज्यपालांना माफी मागायला लावेल, असेही राऊत म्हणाले आहे.
Share Marketशेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स 250 अंकांनी, तर निफ्टी ६१ अंकांनी घसरण
तसेच याच कारणामुळे विरोधी बाकावरील उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. राज्यपालांचा राजीनामा घ्यावा तसेच भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. मात्र असे असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुधांशू त्रिवेदी आणि राज्यपाल कोश्यारी यांची पाठराखण केली आहे. त्यामुळे फडणवीसांच्या याच भूमिकेवर आता उद्धव ठाकरे गटातील नेते संजय राऊत आक्रमक झाले असून त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले राहुल गांधी यांच्या वक्तव्याचे आम्हाला समर्थन करता आले असते. मात्र आम्ही तसे केलेले नसून आम्ही राहुल गांधी यांचा बचाव केलेला नाही. हाच आमच्यात आणि भाजपात फरक आहे.
नाशिकः जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतक-यांना महावितरणाचा मोठा धक्का