वेगवान नाशिक
नाशिक : शहरात सध्या मारामारीच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहे. तसेच परिसरात टवाळखोरांचे प्रमाणात वाढ झाली असून अशातच सातपूरच्या श्रमिकनगर आणि अंबडच्या चुंचाळे शिवारात दोन घटना घडल्या असून यामध्ये संशयितांनी कोयत्याने वार करून दोघांना जखमी केल्याचा प्रकार उघड झाला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी पैशांवर काबू ठेवा..
याबाबत माहिती अशी की, सातपूर परिसरातील श्रमिकनगर येथे कुरापत काढून एकाला दोघांनी मारहाण करीत कोयत्याने वार करून जखमी केले असून सर्फराज खान व त्याचा मित्र असे दोघा संशयितांची नावे आहेत.
याप्रकरणी अभिषेक चंद्रकांत पंडित ( रा. यशराज डुप्लेक्स, श्रमिकनगर, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, दि. १९ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अभिषेक औषधे घेऊन दुचाकीवरून घरी जात असता त्यावेळी संशयित सर्फराज व त्याच्या मित्राने त्यास अडवून तु माझ्या भावाला शिव्या का दिल्या असे विचारले असता अभिषेक याने कोणाला शिव्या दिल्या, तुझा कोणता भाऊ असे म्हटल्याने संशयितांनी त्यास शिवीगाळ करीत मारहाण केली.
Share Marketशेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स 250 अंकांनी, तर निफ्टी ६१ अंकांनी घसरण
त्यानंतर सर्फराज याने त्याच्याकडील ॲक्टिवा (एमएच १५ डीआर ८०२९) च्या डिक्कीतून कोयता काढत अभिषेकच्या डोक्यावर व हातावर मारून जखमी केले. याप्रकरणी सातूपर पोलिसात संशयितांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित सर्फराज यास अटक करण्यात आली आहे.
तर, दुसऱ्या घटनेत अंबड परिसरातील चुंचाळे शिवारात दोघांनी एकाला मारहाण करून धारदार हत्याराने मारून जखमी केले असून सुरेश बोराडे (२३), विकास बनसोडे (२३, रा. दोघे रा. चुंचाळे शिवार, अंबड) असे संशयितांची नावे आहेत. सुरज सुभाष जाधव (रा. चुंचाळे शिवार, अंबड) यांच्या फिर्यादीनुसार, दि. १९ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास किरकोळ भांडणांची कुरापत काढून संशयितांनी सुरजला शिवीगाळ करत धारदार हत्याराने सुरजच्या पोटावर व मांडीवर वार करून जखमी केले. याप्रकरणी अंबड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांना माफी मागावीच लागेल; नाहीतर स्वत:लाच जोडे मारा; शिवसेनेची राज्यपालांवर सडकून टीका