नाशिकः १७ वर्षीय अल्पवयीन तरूणीवर बलात्कार


वेगवान नाशिक

नाशिक : शहरात गुन्ह्याचे सत्र सुरूच असून गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सततचे खून, दरोडे, बलात्कार, अपहरण यासारख्या घटना घडताना दिसत आहे. अशातच शहरातील मखमलाबाद परिसरात एका अल्पवयीन तरूणीवर लैगिंक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी संशयित सर्वेश गोपाळ निकुंभ (२४, रा. दरी मातोरी, ता. जि. नाशिक) या तरूणाविरोधात म्हसरुळ पोलिसात बलात्कारासह पोक्सोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी पैशांवर काबू ठेवा..

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरूणी (१७) हिने दिलेल्या फिर्य़ादीनुसार, दरी-मातोरी परिसरातून ती दररोज शहरात महाविद्यालयीन शिक्षणासाठी ये-जा करत असते. त्यादरम्यान संशयित सर्वेश या तरूणाने तिच्याशी ओळख वाढविली. त्यानंतर त्याने तिला १ जून ते ५ नोव्हेंबर २०२२ या कालावधीमध्ये ओळखीचा फायदा घेऊन मखमलाबाद गावातील एका सोसायटीतील फ्लॅटमध्ये नेले व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

Share Marketशेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स 250 अंकांनी, तर निफ्टी ६१ अंकांनी घसरण

यातूनच हि पीडित तरूणी गर्भवती राहिल्याने तिने याबाबत म्हसरुळ पोलिसात फिर्याद दिली असून त्यानुसार, संशयित सर्वेशविरोधात बलात्कारासह पोक्सोअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक व्ही. के. माळी हे करीत आहे.

SBI ने पेन्शनधारकांसाठी आणलीय ही नवीन सुविधा

 

 

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *