राज्यपालांच्या वादग्रस्त विधानाचा मनमाडला निषेध


वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे,

मनमाड, नांदगाव-

छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श आहेत तर आधुनिक युगातील नितीन गडकरी हे आदर्श आहेत असे वादग्रस्त व अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशारी  यांचे विरोधात मनमाडमध्ये निषेध व्यक्त करीत निदर्शने करण्यात आली.

मनमाड येथे एकात्मता चौकात नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या नेतृत्वाखाली नांदगाव तालुका शिवसेनेच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला.भगतसिंग कोशारी हे वारंवार महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करीत आहेत.  त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा निषेध नोंदवून शिवसैनिकांनी कोशारी यांच्या प्रतिमेला जोडे मारून घोषणा देत परिसर दणाणून सोडला.भगतसिंग कोशारी यांना राज्यपाल म्हणून राहण्याचा अधिकार नसून त्यांना या जबाबदारीच्या पदावरून हटवावे असे उपजिल्हा प्रमुख यांनी यावेळी सांगितले.निवासी तलाठी यांना निवेदन देत जाहीर निषेध नोंदवण्यात आला.

यावेळी उपजिल्हा संघटक,समन्वयक तालुका संघटक, उपतालुका प्रमुख,जिल्हा समन्वयक युवा तालुका प्रमुख,शहरप्रमुख,महिला जिल्हा संघटक,महिला तालुकाप्रमुख,शिवसेना युवासेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर होते.


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *