केंद्र सरकारचे अर्थसंकल्प बैठकीत महत्वाचे निर्णय


वेगवान नेटवर्क

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2023 तयार करण्यासाठी सोमवारी उद्योगांसोबत पहिली बैठक घेतली. या अर्थसंकल्पपूर्व बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली असली तरी पायाभूत क्षेत्राला चालना देण्यावर अधिक भर देण्यात आला. अर्थमंत्र्यांनी पहिल्याच बैठकीत हवामान बदलाचा मुद्दा समाविष्ट केल्यामुळे यंदाचा अर्थसंकल्प पर्यावरणपूरक असणार आहे, असेही या बैठकीतून समजले आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी पैशांवर काबू ठेवा..

यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन , पायाभूत आणि पर्यावरणाशी संबंधित अनेक भागधारकही बैठकीत उपस्थित होते. या बैठकीला वित्त मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी आणि भागवत कराड याशिवाय वित्त सचिव टीव्ही सोमनाथन,आर्थिक व्यवहार विभागाचे अनेक सचिव, दीपम सचिव आणि मुख्य आर्थिक सल्लागार अनंत नागेश्वरन हेही बैठकीत उपस्थित होते.

Share Marketशेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स 250 अंकांनी, तर निफ्टी ६१ अंकांनी घसरण

गेल्या अर्थसंकल्पातही सरकारने पायाभूत क्षेत्रावर अधिक भर दिला होता. मोदी सरकारला विश्वास आहे की पायाभूत क्षेत्राच्या ताकदीमुळे लाखो रोजगार निर्माण होतील, ज्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. पायाभूत प्रकल्पांना निधी देण्यासाठी सरकारने मुद्रीकरण योजनाही सुरू केली आहे. या क्षेत्राला गती देण्यासाठी उद्योगपती आणि पायाभूत क्षेत्राशी संबंधित तज्ञांशी चर्चा करण्यात आली.

तसेच  पूर्व अर्थसंकल्पीय बैठक होणार असून यावेळी कृषी आणि कृषी प्रक्रियेशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. यामध्ये आरोग्य, शिक्षण, पाणी आणि स्वच्छता या क्षेत्राशी संबंधित लोकांचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल. पुढील सार्वत्रिक निवडणूक एप्रिल-मे 2024 मध्ये होणार आहे आणि त्यापूर्वी महागाई, विकास दर, रोजगार यांसारखी अनेक आव्हाने सरकारसमोर आहेत.

SBI ने पेन्शनधारकांसाठी आणलीय ही नवीन सुविधा


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *