आफताब अनिस पुनावाला याला फाशीची शिक्षा द्यावी व वारंवार घडणाऱ्या अशा घटना संबंधी कायदा करावा- राज्य शासनाकडे मागणी


वेगवान नाशिक/Nashik/अविनाश पारखे,

मनमाड,नांदगाव –

महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाला हादरून टाकणारा महाराष्ट्रातील वसई येथील श्रद्धा वालकर हिच्या क्रूर हत्येचा प्रकार नुकताच उघडकीस आला.या हत्येचा निषेध करण्यासाठी आणि राज्य शासनाने त्वरित महाराष्ट्रामध्ये वारंवार घडणाऱ्या अशा घटना विरोधात कठोर कायदा निर्माण करावा या मागणीसाठी आरपीआय नाशिक जिल्हाध्यक्ष राजाभाऊ आहिरे,  भाजपा नासिक जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे,भाजपा मनमाड शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी,भाजपा माथाडी कामगार सेल जिल्हाध्यक्ष नारायण पवार, आरपीआय नेते गंगादादा त्रिभुवन,पी.आर.निळे यांचे नेतृत्वात मनमाड सर्कल अधिकारी सोपान गुळवे यांना निवेदन देण्यात आले.

ही घटना दुर्दैवी असून या क्रूर हत्येचा मनमाड शहर भाजपा व आरपीआय तीव्र शब्दात निषेध करीत आहे. या गुन्हयाचा खटला हा जलदगती न्यायालयात चालविण्यात येऊन मुख्य आरोपी आफताब अनिस पुनावाला याला त्वरित मरेपर्यंत फाशीची शिक्षा व्हावी आणि अशा घटना होऊ नये म्हणुन महाराष्ट्र शासनाने या विरोधात त्वरित कायदा करावा असे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे यांनी यावेळी सांगितले.

आरपीआय तर्फे एडवोकेट प्रमोद आहिरे यांनी देखील कडक शब्दात या घटनेचा निषेध नोंदवला.या प्रसंगी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा जिल्हा अध्यक्ष जलील अन्सारी,भाजपा व्यापारी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन संघवी व्यापारी आघाडीचे जिल्हा सरचिटणीस सचिन लुनावत,भाजपा शहर संघटन सरचिटणीस नितीन परदेशी, भाजपा शहर उपाध्यक्ष संदीप नरवडे, भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा सचिव गौरव ढोले, भाजपा दिव्यांग आघाडीचे जिल्हा सरचिटणीस बुऱ्हाण शेख,दिव्यांग सेल जिल्हा उपाध्यक्ष दिपक पगारे, भाजपा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हा सरचिटणीस अकबर शहा,ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष गोविंद सानप,कल्पेश बेदमुथा,आरपीआय नेते सुरेश शिंदे प्रदीप घुसळे,बाळासाहेब मोरे,सुशील खरे,सुनील बागुल,बाबा शेख शिरीष पगारे,सुरेश जगताप,प्रमोद अहिरे,भाजपाचे तौसिफ़ तांबोळी,नीलकंठ त्रिभुवन भाजपा शहर सचिव अमित सोनवणे,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनंता भामरे,अक्षय सानप भाजपा सहकार आघाडी शहर अध्यक्ष किरण उगलमुगले,भाजपा शहर कोषाध्यक्ष आनंद काकडे,तौसिफ़ तांबोळी आदी पदाधिकारी सह भाजपा,आरपीआयचे कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संयोजन भाजपा मनमाड शहर अध्यक्ष जयकुमार फुलवाणी,नितीन परदेशी यांनी केले


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *