चांदवडः तालुक्यात ७५ गांजाच्या झाडांसह १लाख ३८ हजार ६५४ रूपयांचा मुद्देमाल जप्त


वेगवान नाशिक

चांदवडः  तालुक्यातील जांबुटके शिवारात एकाच्या शेतात गांजाची झाडे आढळून आल्याचं उघड झालं असून ७५ गांजाच्या झाडांसह १लाख ३८ हजार ६५४ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी वडनेर भैरव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी पैशांवर काबू ठेवा..

याबाबत अधिक माहिती अशी की, जांबुटके शिवार शिवओहळ या ठिकाणी आरोपी शंकर बाबू बांडे (५५) याने आपल्या शेतात टोमॅटोचे पाक घेतले असून यातच त्याने ७५ गांजाची झाडे लावल्याचे मिळून आले आहे. तर सदर प्रकरणात  हिरव्यारंगाची मूळासह ओली झाडे साधारण २-४ फूट उंचीची आपल्या शेतात इतर पिकांप्रमाणे जोपासना करून स्वतःच्या कब्जात ठेवताना मिळून आले आहे.

Share Marketशेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स 250 अंकांनी, तर निफ्टी ६१ अंकांनी घसरण

त्यानुसार बांडे याच्यावर  वडनेर भैरव पोलिस ठाण्यात पोलीस निरिक्षक डोमदेव मुरलीधर गवारे यांनी फिर्याद देऊन गांजाच्या झाडांचा २३ किलो ग्रॅम, १०९ ग्रॅम,  १लाख ३८ हजार ६५४ रूपयाचा मुद्देमाल जप्त केला असून  आरोपीवर गुन्हा रजि.नं. २११, आब्लिक २०२२ LDPS कायदा १९८५चे कलम २० व २२ प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.

सदर गुन्ह्याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस  निरिक्षक जी.यू.तायडे यांचे मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

या बँकेच्या व्याजदरात वाढ


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *