वेगवान नाशिक
नवी दिल्ली: सरकारी नोकऱ्यांचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांसाठी भारतीय रेल्वेने आनंदाची बातमी आणली आहे. मध्य रेल्वेमध्ये 596 पदांवर 12वी पास आणि नवीन उमेदवारांसाठी भरती प्रसिद्ध झाली आहे. या नोकऱ्यांसाठी सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून मध्य रेल्वे भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ नोव्हेंबर २०२२ आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी पैशांवर काबू ठेवा..
मध्य रेल्वे भरती 2022 च्या अधिसूचनेनुसार, अर्जासाठी कमाल वयोमर्यादा 42 वर्षे ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर ओबीसींसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी कमाल वयोमर्यादा 47 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.
SBI ने पेन्शनधारकांसाठी आणलीय ही नवीन सुविधा
या भरतींमध्ये स्टेनोग्राफर, कमर्शियल क्लर्क कम तिकीट लिपिक, गुड्स गार्ड, स्टेशन मास्टर, कनिष्ठ लेखा सहाय्यक, कनिष्ठ व्यावसायिक लिपिक कम तिकीट लिपिक, खाते लिपिक या पदांचा समावेश आहे. तसेच या विविध पदांसाठी शैक्षणिक पात्रता स्वतंत्रपणे निश्चित करण्यात आली असून ती पुढीलप्रमाणे आहे- स्टेनोग्राफर – या पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 12वी उत्तीर्ण असावा. यासोबतच स्पर्धकाला शॉर्टहँड स्पीड आणि स्टेनोचे ज्ञान असणे बंधनकारक आहे., वरिष्ठ व्यावसायिक लिपिक कम तिकीट लिपिक – उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा त्याच्या समकक्ष असणे आवश्यक आहे.
गुड्स गार्ड – अर्जदाराकडे पदवी किंवा कोणतीही समकक्ष पदवी असणे आवश्यक आहे.
स्टेशन मास्टर – या पदासाठीच्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. कनिष्ठ खाते सहाय्यक – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी किंवा समतुल्य पदवी असणे आवश्यक आहे. कनिष्ठ व्यावसायिक लिपिक कम तिकीट लिपिक – उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळाकडून किमान ५०% गुणांसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी., लेखा लिपिक – स्पर्धक किमान 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण असावा. या पदासाठी तर आरक्षित वर्गांना नियमानुसार सवलत दिली जाते.
Share Marketशेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स 250 अंकांनी, तर निफ्टी ६१ अंकांनी घसरण
दरम्यान मध्य रेल्वेसाठी या उमेदवारांची निवड लेखी चाचणी, टायपिंग किंवा कौशल्य चाचणी, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल. त्यासाठी मध्य रेल्वे भरती 2022 साठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.
केंद्र सरकारचे अर्थसंकल्प बैठकीत महत्वाचे निर्णय