आदित्य ठाकरे यांचे मतदारांना भावुक पत्र; गद्दार म्हणत विरोधकांना टोला


वेगवान नाशिक

मुंबईः गेल्या ४ महिन्यांपासून शिवसेना नेते आदित्य ठाकरे शिवसेनेत आक्रमक बनून पुढे येत आहेत. आपल्या भाषणात शिंदे गट आणि भाजप नेत्यांवर ते जोरदार निशाणा साधत आहेत. त्याबरोबर, पत्रकार परिषद आणि पत्रकारांसमोर येताना महत्त्वाचे मुद्दे घेऊन सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी पैशांवर काबू ठेवा..

तसेच शिंदे गटातील आमदार आणि नेत्यांना सातत्याने गद्दार म्हणत आदित्य ठाकरे लक्ष्य करत असल्यामुळे  ते चांगलेच चर्चेत आहेत.

अशातच त्यांनी आता, आपल्या मतदारसंघातील जनतेसाठी  भावनिक पत्र लिहिले असून गेल्या ३ वर्षांच्या कार्यकाळात आपण वरळीचा चांगला विकास केल्याचंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे. तसेच गेल्या ३ वर्षात वरळीला प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी आपण सर्व एक संघ म्हणून काम करत आहोत, असे आदित्य यांनी पत्रात म्हटले आहे.

केंद्र सरकारचे अर्थसंकल्प बैठकीत महत्वाचे निर्णय

दरम्यान, यापूर्वी जूनमध्ये गलिच्छ राजकारण आणि गद्दारी करून लोक हिताचा विचार करणारे सरकार पाडलं गेलं. पण ते आम्हाला निःस्वार्थपणे काम करण्यापासून आणि आपली सेवा करण्यापासून रोखू शकणार नाहीत. असं पत्राद्वारे भावनिक सादही आदित्य ठाकरे यांनी  घातली आहे.

SBI ने पेन्शनधारकांसाठी आणलीय ही नवीन सुविधा

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *