वेगवान नाशिक
नवी दिल्लीः सप्टेंबर तिमाही निकालानंतर तेजीत असलेल्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या समभागात कालही जोरदार वाढ दिसून आली. हा मल्टीबॅगर स्टॉक BSE वर 5.5% ने वाढून Rs 74.45 वर पोहोचला आणि हा त्याचा 3 वर्षांचा उच्चांक आहे. यापूर्वी जुलै 2019 मध्ये बँकेचे शेअर्स या पातळीवर व्यवहार करत होते. गेल्या 6 महिन्यांत या शेअरमध्ये 108 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशा प्रकारे या कालावधीत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कट-कारस्थानापासून सावधान!
तसेच गेल्या महिन्यात युनियन बँकेने 20 ऑक्टोबर रोजी सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले असूनअवघ्या एका महिन्यात हा शेअर जवळपास 60 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे या बँकेच्या शेअरवर ब्रोकरेज तेजीत असून गुंतवणूकदारही यात मोठी गुंतवणूक करत आहेत.
तर सप्टेंबरच्या तिमाहीत युनियन बँकेचा नफा 21.07 टक्क्यांनी वाढून 1,848 कोटी रुपये झाला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत ते 1,526 कोटी रुपये होते. त्यात बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न सप्टेंबर तिमाहीत 21.61 टक्क्यांनी वाढून 8,305 रुपये झाले आहे आणि बँकेचे निव्वळ व्याज मार्जिन सप्टेंबर तिमाहीत 2.95 टक्के आहे. त्यामुळे या बँकेच्या मालमत्तेची गुणवत्ता सप्टेंबरच्या तिमाहीत सुधारली आहे.
राऊतांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…
तर बँकेच्या निकालानंतर बहुतांश विश्लेषकांनी या शेअरमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली होती. त्रैमासिक निकालांनंतर, मोतीलाल ओसवाल यांनी स्टॉकवर 65 रुपयांच्या लक्ष्य किंमतीसह स्टॉकवर खरेदी रेटिंग दिले आहे. आता हे लक्ष्य पूर्ण झाले आहे.
युनियन बँक अशा समभागांच्या यादीत सामील झाली आहे ज्यांनी गेल्या 6 महिन्यांत त्यांच्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले असून या बँकेने 6 महिन्यांत गुंतवणूकदारांना 108% परतावा दिला आहे.
LIC च्या या 3 योजनांमध्ये मिळणार बंपर फायदा