किशोरी पेडणेकरांनी ताब्यात घेतलेल्या त्या ४ सदनिका निष्कासित करण्याचे आदेश- एसआरए अधिकारी


वेगवान नाशिक

मुंबई: काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्या चार सदनिकांविषयी एसआरएमध्ये तक्रार केली होती. तसेच पेडणेकरांनी सदनिका बळकावल्यामुळे त्यांच्या बेनामी सदनिकांवर कारवाई करा, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली होती.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कट-कारस्थानापासून सावधान!

त्यानंतर एसआरएने आता किशोरी पेडणेकर यांना मोठा झटका दिला असून त्यांच्या वरळीताल बळकविलेल्या चार सदनिका ताब्यात घेण्याचे आदेश एसआरएने मुंबई महापालिकेला दिले आहेत.

दरम्यान किशोरी पेडणेकर यांनी वरळी गोमाता जनता येथे चार सदनिका बेनामी ताब्यात घेतल्या होत्या. त्याविरोधात एसआरएने आदेश दिला असून मुंबई महापालिकेने या बेनामी सदनिका चार दिवसात ताब्यात घ्याव्यात असे आदेश दिल्याचं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.

राऊतांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

याबाबत एसआरए अधिकार्‍यांनी किशोरी पेडणेकर, किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस आणि बेनामी सहकारी विरुद्ध कलम 3ए अंतर्गत या सदनिकांचे निष्कासन करण्याचे आदेश दिले आहेत. तर पुढील आठवड्यात हे निष्कासन होणार असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे.

LIC च्या या 3 योजनांमध्ये मिळणार बंपर फायदा

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *