वेगवान नाशिक
नाशिक : जिल्ह्यात सध्या नाशिकसह निफाडमध्ये तापमानात घट झाल्याने जागोजागी शेकोट्या पेटू लागल्या आहेत. त्याचबरोबर स्वेटर, जर्किंग खरेदीलादेखील आता शहरात वेग आला आहे. तसेच थंडी वाढल्याने सर्दी खोकल्याचा संसर्गजन्य आजारातही वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कट-कारस्थानापासून सावधान!
सध्यस्थिती पाहता किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत तीन अंश सेल्सिअसणे तापमानात घट होत पारा १०.४ अंशांवर आला आहे तर नाशिकच्या निफाडमध्ये ८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांमध्ये राज्याच्या तापमानात घट होणार असून मुख्यतः कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
तसेच उत्तरेकडून येत असलेल्या गार वाऱ्यांमुळे गेल्या तीन ते चार दिवसांपासून किमान तापमानात वेगाने घट होत आहे. त्यात
नाशिकमध्ये तापमानात होत असलेल्या घसरणीमुळे गुलाबी थंडीने आता नाशिककर हूड हूडू लागले आहेत. त्यामुळे काही भागात धोक्याची धुलाई पसरू लागल्याने नभच जमिनीवर उतरून आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
तर एकीकडे शहरी भागातील नागरिक गुलाबी थंडीचा आनंद जरी घेत असले तरी देखील आता द्राक्ष पंढरीतील द्राक्ष उत्पादक थंडीमुळे धास्तावले आहेत. थंडीमुळे द्राक्षांच्या मनिला तडात जात असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये थंडीची दहशत पसरली आहे.
या बँक स्टॉकने 6 महिन्यांत पैसे झाले दुप्पट