वेगवान नाशिक
मुंबई : दिल्लीच्या मेहरौलीमध्ये लिव्ह-इन-पार्टनर श्रद्धाच्या हत्येचा आरोप असलेल्या आफताबला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेना नेत्या आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्हे यांनीही आता आफताबला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम प्रकाश बिर्ला यांची भेट घेतली आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कट-कारस्थानापासून सावधान!
याआधी काल नीलम गोर्हे या श्रद्धा वालकरच्या वडिलांना भेटण्यासाठी आल्या होत्या. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला असून आफताबला फाशी द्यावी, अशी आमची मागणी आहे. त्यामुळे सोशल मीडियावरही श्रद्धा वालकरचा खून करणाऱ्या आफताबला फाशीची शिक्षा देण्याची मागणी होत आहे.
या बँक स्टॉकने 6 महिन्यांत पैसे झाले दुप्पट
दरम्यान अनेक धार्मिक संघटनांमध्येही आफताबविरोधात रोष आहे. त्यामुळेच आफताबच्या हजेरीवेळी वकिलांनी साकेत कोर्टात गोंधळ घातला आणि त्याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. आफताबविरोधातील जनक्षोभ पाहता पोलिसांनी त्याच्या सुरक्षेत वाढ केली आहे. एवढेच नाही तर हल्ला होऊ नये म्हणून त्याचे ठिकाणही वारंवार बदलले जात आहे.
तसेच आफताब पूनावाला 18 मे रोजी त्याच्या लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे करून अनेक महिने मेहरौली येथील जंगलात फेकल्याचा आरोप आहे.
अजित पवारांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता