वेगवान नाशिक
नाशिक : शहरात सध्या आग लागल्याच्या घटना खूप वाढल्या असून त्यात अनेक जणांचे बळी जात असल्याचं समोर येत आहे. त्यात प्रशासनाला घटना घडून गेल्यानंतर जाग येते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष होत असल्याने याबाबत नाशिक महानगर पालिकेच्या प्रशासनाने कठोर पाऊल उचलले असून फायर ऑडिट न करणाऱ्या १६० रुग्णालयांवर कारवाई करण्यात येणार आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कट-कारस्थानापासून सावधान!
याबाबत नाशिक महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने संबंधित रुग्णालयांना वारंवार नोटिसा देण्यात आल्या असून देखील खाजगी रुग्णालयांनी पालिकेच्या नोटिसांना केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे आता त्या खाजगी रुग्णालयांना वीज आणि पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
या बँक स्टॉकने 6 महिन्यांत पैसे झाले दुप्पट
तसेच शहरातील खाजगी रुग्णालये आणि विविध आस्थापना यांनी फायर ऑडिट करून घेणे अत्यंत गरजेचे असते, त्याबाबत पालिका प्रशासन अहवाल मागवत असते.आणि त्याप्रमाणे मनपाच्या अग्निशमन दलाच्या विभागाकडून फायर ऑडिट करण्याच्या सूचना केल्या जात असून, त्यानुसार संपूर्ण शहरातील अस्थापणांनी ऑडिट करून अहवाल जमा करायचा असतो.
मात्र, अद्यापही नाशिक मधील 160 रुग्णालयांनी पालिकेच्या नोटीसीद्वारे जे आदेश केले आहेत याचे पालन केले नसल्यामुळे आता त्यांचे वीज आणि पाणी कनेक्शन बंद करण्याची कारवाई केली जाणार आहे.