Nashik नाशिक-मुंबई महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू


वेगवान नाशिक

नाशिकः नाशिक मुंबई- महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना घडली आहे. दिनांक १८ रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर वाडीवऱ्हे शिवारात बिबट्या  रस्ता ओलांडत असताना भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली असून यामध्ये बिबट्याची साडे तीन वर्षांची मादी गंभीर जखमी झाली आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कट-कारस्थानापासून सावधान!

दरम्यान मुंबई महामार्गावर गौळाणे, रायगडनगर, वाडीवऱ्हे या शिवारात महामार्गावर बिबट्याचा रात्री संचार असतो. या परिसरात बिबट्याचा अधिवास असून हा संपूर्ण भाग कॉरिडोर आहे. याबाबत नागरिकांनी वाडीवऱ्हे पोलीस आणि वनविभागाला माहिती कळविली असून घटनेची माहिती मिळताच नाशिक, इगतपुरी वनपरिक्षेत्राचे आधिकारी, कर्मचारी यांचे रेस्क्यू पथक, मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले, इको-एको वन्यजीवप्रेमी संस्थेचे स्वयंसेवक घटनास्थळी पोहचले आहे.

कच्च्या तेलाच्या दरात घसरण

मिळालेल्या माहितीवरून वनविभागाच्या रेस्क्यू टीमने तात्काळ घटनास्थळी दाखल होत जखमी बिबट्याला सुरक्षित पिंजऱ्यात घेत उपचारासाठी हलविले. मात्र उपचारादरम्यान मादीचा मृत्यु झाला असल्याचे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे.

या बँक स्टॉकने 6 महिन्यांत पैसे झाले दुप्पट

 

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *