वेगवान नाशिक
नाशिक : सध्या अनेक ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरळीत नसल्यामुळे शेतक-यांना आर्थिक उत्पन्न काढण्यात अडथळे निर्माण होत असल्याच दिसत आहे. त्यामुळे सरकारने आता राज्यातील ग्रामीण भागात कृषी वीजवाहिन्यांचे सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याकरिता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कट-कारस्थानापासून सावधान!
तर त्यासाठी लागणाऱ्या जमिनी महावितरणद्वारे प्रतिवर्ष ७५ हजार रुपये प्रतिहेक्टर दराने भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. तसेच या योजनेच्या माध्यमातून तीन हजार कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जाकरण करण्यात येणार असून, १५ हजार एकर जमिनीवरून सुमारे चार हजार मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे. त्यामुळे या योजनेसाठी जागा देणाऱ्या शेतकऱ्यांना कायमस्वरूपी आर्थिक उत्पन्न मिळू शकणार आहे.
या बँक स्टॉकने 6 महिन्यांत पैसे झाले दुप्पट
याद्वारे महावितरणाचा कृषी वाहिन्यांवरील कृषी ग्राहकांना दिवसा आठ तास वीज देण्याचा प्रयत्न असणार आहे. म्हणूनच त्याकरता भूसंपादनाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महावितरणने ऑनलाइन लँड पोर्टल सुरू केले आहे. त्यात शेतकरी किंवा तत्सम व्यक्ती विकेंद्रित सौर प्रकल्प उभारण्यासाठी आपली जमीन देऊ शकतो.
पुढील २ दिवस राज्याच्या तापमानात होणार घट, हवामानाचा अंदाज
तसेच राज्य सरकारने प्रत्येक जिल्ह्यातील ३० टक्के कृषी वाहिन्या सौरऊर्जेवर आणण्याबाबतचे निश्चित केले असून त्यासाठी चार हजार मेगावॅट वीजनिर्मितीसाठी महावितरण शेतकऱ्यांची जमीन भाडेतत्त्वावर घेणार आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची घोषणा, या तारखेपासून होणार सुरू