नाशिकः त्र्यंबकरोड परिसरात कार व दुचाकीचा अपघात, दोनजण जखमी


वेगवान नाशिक

नाशिकः शहरातील त्र्यंबकरोड शरणपूर रोड येथे दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली असून दोनजण जखमी झाले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कट-कारस्थानापासून सावधान!

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, त्र्यंबकरोड शरणपूर रोड नाशिक या ठिकाणी आरोपी हिरामण कारभारी धात्रक याने त्यांच्या ताब्यातील कार ही नाशिक ते त्र्यंबकेश्वर रोडने नाशिकहून सातपूरकडे चालवून नेत असतांना रस्त्याच्या परिस्थितीकडे व सिग्नलकडे दुर्लक्ष करून हयगयीने भरधाव वेगात कार चालवून सिग्नल लाल असताना सिग्नल तोडून कॅनडा कॅार्नरकडून सातपूर बाजूकडे जाणारी दुचाकी हिच्या डाव्या बाजूस जोरदार ठोस मारून अपघात केला आहे.

कच्च्या तेलाच्या दरात घसरण

सदर अपघातात तुकाराम हौशीराम सोनजे यांच्या डाव्या हाताच्या मनगटास कमेरेस व डाव्या पायाचे पोटरीस मुका मार लागला आहे. तसेच सोनजे यांच्या दुचाकीवर पाठीमागे बसलेली मुलगी अस्मिता सोनजे हिच्या डाव्या पायाच्या पंजास जबर मार लागून पायाचे हाड फॅक्चर होऊन उजव्या हाताचा कोपरास मार लागून दुखापत झाली आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची घोषणा, या तारखेपासून होणार सुरू

याप्रकरणी दुचाकीचे व स्वःताचे कारचे नुकसानीस कारणीभूत झाला म्हणुन आरोपी हिरामण कारभारी धात्रक यांच्या विरूद्ध सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच क्राईम पो.निरिक्षक चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देत अधिक माहिती जाणून घेतली असून याबाबत पोलिस हवालदार शिंदे अधिक तपास करीत आहेत.

या बँक स्टॉकने 6 महिन्यांत पैसे झाले दुप्पट


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *