नाशिकः जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतक-यांना महावितरणाचा मोठा धक्का


वेगवान नाशिक

मनमाड : नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे खरीपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे सध्या रब्बीच्या पेरणीकरता शेतक-यांची जुळवाजुळव सुरू असून बी-बियाणे विकत घेण्यासाठी धावपळ चालू आहे. अशातच मनमाडसह नांदगाव तालुक्यात महावितरणाने वीजबिल वसुली सुरू केल्याने शेतकऱ्यांना ऐन हंगामात धक्का बसला आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कट-कारस्थानापासून सावधान!

दरम्यान वीज महावितरणाने ज्यांच्याकडे थकबाकी आहे, त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यात या विभागांतर्गत असलेल्या तालुक्यातील मनमाड भागात एकूण १३८ रोहित्र आहेत. या रोहित्रांवर पाच हजार ८८० शेतीपंप ग्राहक असून यातील थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांकडे ७५ कोटींची थकबाकी आहे. त्यामुळे थकबाकी वसुली होत नसल्यामुळे ऐन हंगामात महावितरण कंपनीने २४ रोहित्र बंद केले आहे.

नाशिकः मराठा समाजाला १०% आणि ओबीसींना हक्काचे २७%आरक्षण देण्याची मागणी- छगन भुजबळ

तसेच एकीकडे शेतकऱ्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येऊ नये, असा शासनाचा आदेश असतानाही मनमाड, नांदगाव तालुक्यांत महावितरण कंपनीने शेतकऱ्यांयांकडून सक्तीने थकीत वीजबिल वसुली सुरू केली आहे. त्यात वीज खंडित झाल्याने पाणी भरावी लागणारी पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये महावितरणाबद्दल नाराजी पसरली आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची घोषणा, या तारखेपासून होणार सुरू

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *