उद्योग वाढीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


वेगवान नाशिक

नाशिक : जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रास चालना देणारे पोषक वातावरण आहे. त्यादृष्टीने उद्योगांच्या वृद्धीसाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकरिता शासन कटिबद्ध आहे. स्थानिक औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योजकांसोबत वेळोवेळी बैठका घेवून कालबद्धरीत्या प्रश्नांचे निराकरण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कट-कारस्थानापासून सावधान!

नाशिक औद्योगिक व एसएमई यांच्यातर्फे आयोजित परिषदेत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज ध्वनीचित्रफितीद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. त्यावेळी  श्री. शिंदे म्हणाले की, नाशिक कुंभमेळा व तीर्थक्षेत्रांची पावन भूमी असून थोर विचारवंत व समाज सुधारकांचा वारसा या शहराला आहे. त्यामुळे उद्योजक व नवउद्योजकांच्या मार्फत कृषी क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण प्रयोग राबविण्यात  येत आहेत.

नाशिकः मराठा समाजाला १०% आणि ओबीसींना हक्काचे २७%आरक्षण देण्याची मागणी- छगन भुजबळ

तसेच या उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या भांडवलासोबतच येथील लोकांमध्ये उद्यमशील मानसिकता उपजतच आहे. त्यामुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ या संकल्पनेच्या यशस्वितेसाठी उद्योजकांचा हातभार लागत आहे. म्हणूनच औद्योगिक वसाहतीत चांगले रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन तसेच आवश्यक मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत.

अजित पवारांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता

त्यानंतर लॉजिस्टीक पार्क, एक्झीबीशन सेंटर्स, इलेक्ट्रीकल हब, इंडस्ट्रीअल पार्ककरीता केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जात असून उद्योजकांना जागा वाटप प्रक्रीया जलद व सुलभतेने करण्यात येत आहे. गेल्या चार महिन्यांत शासनास्तरावर उद्योगवाढीसाठी पायाभूत सुविधा, उद्योगातील गुंतवणूक व रोजगार वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत असून त्यासोबतच पायाभूत विकास प्रकल्पांना वॉर रूमच्या माध्यमातून सनियंत्रित केले जात असून यातून कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमातून सुमारे सव्वा लाख बेरोजगारांना रोजागार देण्यास प्रारंभ झाला असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची घोषणा, या तारखेपासून होणार सुरू


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *