वेगवान नेटवर्क
सध्या डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असल्याने सायबर भामटे सर्वसामान्य नागरिकांची ऑनलाइन आर्थिक फसवणूक करण्यासाठी नवनवीन युक्त्या शोधत आहेत.जर तुम्हीही ई-कॉमर्स साइटवरून खरेदी करत असाल, तर गेल्या काही काळात सायबर गुन्हेगारांचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे ऑनलाइन शॅापिंग करताना जरा सावधान नाहितर फसवणूकीला बळी पडशाल.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कट-कारस्थानापासून सावधान!
दरम्यान नजफगडमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला काही दिवसांपूर्वी फोन आला आणि सांगितले. तुमचं पार्सल आलेलं आहे. त्याचे कॅश ऑन डिलिव्हरीमधून पेमेंट करायचे आहे. पण या व्यक्तीने कोणत्याही प्रकारची ऑनलाईन ऑर्डर दिली नसता त्याच्या दरवाजात नेमकी कोणती कॅश ऑन डिलिव्हरीची ऑर्डर आली याची चौकशी करण्यासाठी तो खाली गेला तेव्हा डिलिव्हरीमध्ये काहीतरी बुक केले असून आता तुम्हाला त्याचे पैसे द्यावे लागतील,असे सांगून त्याच्या खात्यातील सर्व पैसे काढण्यात येणार होते. अशा प्रकारे मार्ग वापरून सामान्य नागरिकांची फसवणूक केली जात आहे.
अजित पवारांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता
तसेच हे ठग आता पोलीस अधिकारी बनून प्रलंबित ईएमआयसाठी ग्राहकांना बोलावून त्यांची फसवणूक करतात. अलीकडेच, दिल्लीतील पालम विहार पोलिस स्टेशनचे एसएचओ म्हणून ठगांनी एका व्यक्तीला फोन केला आणि सांगितले की तुमची ईएमआय बाकी आहे. तुमचा EMI ताबडतोब भरा,अन्यथा आम्ही गुन्हा दाखल करू. असे सांगून पैसे ट्रान्सफर करून घेतले जातात.
म्हणूनच जर कोणी तुमच्याकडे ऑनलाईन ऑर्डर घेऊन आलं असेल तर त्याच्याकडे पहिला पुरावा मागवा. तसेच तुमच्या बाजूने पुरावा दाखवा की तुम्ही कोणतीही ऑर्डर दिली नाही. तुम्ही मोठ्या शॉपिंग वेबसाइट किंवा अॅपच्या पेजला भेट देऊन ऑर्डर दिली नाही हे दाखवू शकता. तसेच कोणतीही ऑर्डर रद्द करण्यासाठी पाठवलेला OTP शेअर करू नका.
या बँक स्टॉकने 6 महिन्यांत पैसे झाले दुप्पट