वेगवान नाशिक
सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने चढ-उतार सुरू असल्याचं दिसत आहे. त्यात काही दिवसांपूर्वी 100 डॉलर प्रति बॅरल इतका दर असणाऱ्या कच्च्या तेलाच्या दरात पुन्हा एकदा घसरण दिसून आली आहे. तर ब्रेंट क्रूड ऑईलच्या दरात प्रति बॅरल 2.41 टक्क्यांनी म्हणजे 2.16 डॉलरची घसरण झाली आहे. तर, WTI क्रूड ऑईलच्या दरात प्रति बॅरल 1.56 डॉलरची घसरण झाली आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कट-कारस्थानापासून सावधान!
या पार्श्वभूमीवर भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील इंधन कंपन्यांनी आजचे इंधन दर जाहीर केले असून कंपन्यांनी भारतीय ग्राहकांना कोणताही दिलासा नसून आजही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.
तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी कच्च्या तेलाच्या दरात उसळीआली होती. तेव्हा ब्रेंट क्रूड ऑईलचा दर प्रति बॅरल हा 100 डॉलरजवळ पोहचला होता. त्यात केंद्र सरकारने मे महिन्यात उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर पेट्रोल, डिझेलच्या दर कमी झाले होते.
किशोरी पेडणेकरांनी ताब्यात घेतलेल्या त्या ४ सदनिका निष्कासित करण्याचे आदेश- एसआरए अधिकारी
देशातील प्रमुख शहरातील दर- दिल्ली: पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर, कोलकाता पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर, चेन्नई पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर, मुंबई: पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर प्रमाणे आहे.
LIC च्या या 3 योजनांमध्ये मिळणार बंपर फायदा