वेगवान नाशिक
नाशिक : सध्या लवकरच आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. त्यादृष्टीने तयारी करून आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, नगरपालिका, महानगरपालिका, बाजार समित्या व इतर सहकारी संस्थांवर जास्तीत जास्त उमेदवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निवडून येण्यासाठी नियोजन करा असे आवाहन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कट-कारस्थानापासून सावधान!
तसेच याबाबत नाशिक शहर व जिल्हा आढावा बैठक माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी भवन नाशिक येथे पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शहर व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांकडून पक्षाच्या कामकाजाबाबत छगन भुजबळ यांनी आढावा घेतला असून भुजबळ म्हणाले की, इच्छुक उमेदवारांनी प्रत्येक घराघरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार आणि प्रसार करावा. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जास्तीत जास्त उमेदवार निवडून आले तरच पक्षाची ताकद ही वाढत असते. त्यामुळे संपूर्ण तयारी करून ताकदीनिशी या निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे.
त्यासाठी उमेदवारांनी आपली ताकद आणि तयारी अतिशय प्रभावीपणे करावी आणि जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना त्यांनी उपस्थितांना केल्या आहेत. तसेच देशातील सत्ता ही मोजक्या धर्मांध लोकांच्या हातात जाणे हे लोकशाहीसाठी अतिशय घातक असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या संस्थांवर बहुजन समाजातील प्रतिनिधी निवडून द्यायला हवेत. सिनेट निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि समविचारी पक्षाचे प्रतिनिधी निवडणूक लढत आहे. या सर्वांना मोठ्या मताधिक्याने आपण निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
या बँक स्टॉकने 6 महिन्यांत पैसे झाले दुप्पट
त्यानंतर भुजबळ म्हणाले की, दि.९ डिसेंबर २०२२ पर्यंत पदवीधर मतदारसंघासाठी जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्यात यावी, शहर व जिल्ह्यात बूथ कमिट्या तयार कराव्यात, शहरात वार्ड प्रमुख, प्रभाग प्रमुख, विभाग प्रमुख, जिल्ह्यात गट प्रमुख, गणप्रमुख, गाव प्रमुख नेमणूक करून निवडणुकांची परिपूर्ण तयारी करण्याच्या सूचना भुजबळांनी केल्या आहेत.
राऊतांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…