वेगवान नाशिक
पेठः नाशिक जिल्ह्यात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. पेठ तालुक्यातील आसरबारी ते गोंदे परिसरात सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास भूकंप सदृश्य धक्के जाणवले असल्याचं सांगितलं जात आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कट-कारस्थानापासून सावधान!
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, तालुक्यात अचानक जमिनीला हादरे बसले असून जमीन हादरायला लागल्याने नागरिकांनी परिसरात जाऊन पाहिले असता त्यांना भूकंपसदृश्य धक्के असल्याचे जाणवले. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी लगेच तहसिलदारांशी संपर्क साधला आहे.
त्यानंतर येथील तहसिलदारांनी तात्काळ मेरीच्या यंत्रणेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यास कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने अधिकृत माहीती प्राप्त झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मेरीच्या भूकंपमापन यंत्रणेशी संपर्क साधल्यानंतर दुरध्वनी वाजत असून देखील समोरून कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची घोषणा, या तारखेपासून होणार सुरू
याबाबत परिसरातील नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचा इशारा तालुक्यातील तहसिलदारांकडून देण्यात आला आहे.
नाशिकः सौर शेती अंतर्गत शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाच्या संधी