वेगवान नाशिक
मुंबई : दोन वर्षांपूर्वी राज्यातील अनेक राजकीय नेत्यांसह अजित पवार असे ७५ जणांवर बँकेतील घोटाळ्याप्रकरणी चौकशीची कारवाई झाली होती. त्यात राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा सक्रिय झाली असून यामध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि रोहित पवार यांची चौकशी करण्यात येणार आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांनी कट-कारस्थानापासून सावधान!
तसे यांच्याशी संबंधित असलेल्या कंपन्यांची चौकशी करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडून कोर्टाकडे परवानगी मागण्यात आली आहे. कारण यात अजित पवार आणि रोहित पवार यांच्याशी संबंधित कंपन्यांनी साखर कारखाने विकत घेताना संशयास्पद व्यवहार केल्याचा गुन्हे शाखेला संशय आहे.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची घोषणा, या तारखेपासून होणार सुरू
दरम्यान यामध्ये जरंडेश्वर साखर कारखाना तसंच रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीकडून खरेदी करण्यात आलेल्या साखर कारखान्यांचा समावेश आहे. त्यामुळे कोर्टाने परवानगी दिल्यास आर्थिक गुन्हे शाखेकडून पवार काका-पुतण्याचीही चौकशी होऊ शकते.
पुढील २ दिवस राज्याच्या तापमानात होणार घट, हवामानाचा अंदाज