वेगवान नेटवर्क
वाहन कंपन्या सध्या आपल्या नवनवीन कार बाजारात आणताना दिसत आहे. ग्राहक हे नवीन कारच्या प्रतिक्षेतच असतात. त्यामुळे भारतात फ्रान्सची वाहन निर्माता कंपनी असलेल्या Citroen च्या पोर्टफोलियोमध्ये सध्या C3 हॅचबॅक आणि C5 एअरक्रॉस, असे दोन प्रोडक्ट आहेत.
शिंदे फडणवीस सरकारकडून मविआच्या या निर्णयाला स्थगिती
त्यात कंपनी आता कंपनी C3 हॅचवर आधारलेले एक नव्या 7-सीटर मॉडेलसह कॉम्पॅक्ट MPV सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याची योजना आखत असून नवी सिट्रोएन 7-सीटर एमपीव्ही ही मारुती सुझुकी एर्टिगाला टक्कर देण्यासाठी सज्ज आहे.
LIC च्या या 3 योजनांमध्ये मिळणार बंपर फायदा
या नवीन Citroen 7-सीटर MPV दिसायला C3 सारखी असू शकते. मात्र ही लांब असेल आणि यात अधिक केबिन स्पेस असेल. टेस्टिंगदरम्यान जे मॉडेल दिसून आले होते, त्यात C3 च्या 17-इंच व्हील ऐवजी 16-इंचाचे व्हील दिसून आले होते. तसेच या 7-सीटर MPV मध्ये इतरही काही स्टँडर्ड फीचर्स असू शकतात. एवढेच नाही, तर ही 6 आणि 7-सीट कॉन्फिगरेशनसह उपलब्ध केली जाऊ शकते.
तर नवी सिट्रोएन एमपीव्ही सी-3 हॅचबॅककडून घेण्यात आलेले स्टेलेंटिसच्या सीएमपीवर डिझाइन केले जाईल. मात्र, कंपनी 4 मीटरहून अधिक लांब असलेल्या मॉडेलसाठी आपल्या आर्किटेक्चरमध्ये बदल करू शकते. त्यामुळे इंटीरियर लेआउट आणि फीचर्स C3 हॅच सारखे असण्याची शक्यता आहे.
सरकारी रेशन घेणाऱ्यांसाठी सरकारचा नवा नियम