वेगवान नाशिक
गेल्या काही दिवसापासून देशभरात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रा सुरू असून या यात्रेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याने अनेक नेते आक्रमक झाले आहेत. त्यात सावरकरांविषयी केलेलं चुकीचं वक्तव्य शिवसेनेला मान्य नाही, शिवसेना ते सहन करणार नाही असं संजय राऊत म्हणाले आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांचे परदेश प्रवासाचे स्वप्न होणार पूर्ण
तसेच यामुळे फक्त शिवसेनेलाच धक्का बसला असं नाही तर महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना देखील धक्का बसला असल्याचे राऊत म्हणाले. यामुळे महाविकास आघाडीतही फूट पडू शकते असं मोठं विधान राऊतांनी केलं आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी पुन्हा लांबणीवर
त्यानंतर राऊत म्हणाले, इतिहासकाळात काय घडलं आणि काय नाही घडलं यापेक्षा नवा इतिहास निर्माण करावा या मताचे आम्ही आहोत. राहुल गांधींनी त्याकडं लक्ष द्याव. तसेच मला कळत नाही भाजपमध्ये जे नवीन सावरकर भक्त निर्माण झाले आहेत, ते सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी उचलून का धरत नाहीत? असा सवाल राऊतांनी यावेळी केला.
तसेच सध्या महागाई, बेरोजगारी, महिला अत्याचार वाढत आहेत. या मुद्यावर भारत जोडो यात्रा सुरु आहे. त्याला चांगल समर्थन मिळत आहे. अशात सावरकरांचा विषय काढण्याची काही करज नव्हती असेही राऊत यावेळी म्हणाले.
मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारचे १५ महत्त्वाचे निर्णय