वेगवान नाशिक
मुंबई : काही दिवसांपूर्वी मनी लाँड्रिंग प्रकरणात सचिन वाझेला अटक करण्यात आली होती. तर याबबात एक मोठी बातमी समोर आली आहे. सचिन वाझे याला मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला आहे.
आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांचे परदेश प्रवासाचे स्वप्न होणार पूर्ण
मात्र वाझेला जामीन मंजूर झाला असला तरी त्यांना इतर प्रकरणांमुळे जेलमधून सुटका होणार नाहीय. तसे ईडीने वाझेला जामीन देण्यास नकार दिला होता. पण न्यायलयाने हा विरोध फेटाळला असून वाझेला जामीन दिला आहे.
शिंदे फडणवीस सरकारकडून मविआच्या या निर्णयाला स्थगिती
दरम्यान महाविकास आघाडी सरकार होते तेव्हापासून १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप आणि ऍटेलिया बंगल्यासमोर स्फोटके ठेवल्याप्रकरणी वाझे कारागृहात आहे. यात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख देखील कारगृहात आहेत.
तर याबाबत मुंबई सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून निर्णय घेतला असून वाझेच्या विरोधात ईडी, सीबीआय आणि एनआयए प्रकरण प्रलंबित आहे.
सरकारी रेशन घेणाऱ्यांसाठी सरकारचा नवा नियम