नाशिकः शहरात मद्यधुंद वाहनचालकाचा थरार, चारजण गंभीर जखमी


वेगवान नाशिक

नाशिक : शहरात भरदिवसा मद्यधुंद अवस्थेतील प्राध्यापक कारचालकाने अक्षरशः धिंगाणा घातला असून चारजणांना उडवून दोघाजणांना गंभीर तर आणखी दोनजणांना किरकोळ जखमी केल्याची घटना उघड झाली आहे. यामुळे शहरात जोरदार चर्चा होत असून  कारचालकावर कठोर कारवाई करा अशी संतप्त मागणी होऊ लागली आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांचे परदेश प्रवासाचे स्वप्न होणार पूर्ण

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील  उपनगरपासून लेखानगर मार्गे चांडक सर्कलपर्यंत मद्यधुंद अवस्थेतील बिटको महाविद्यालयात प्राध्यापक असलेल्या कारचालकाने धिंगाणा घालत चौघांना ठोकले असून दोघेजण गंभीर तर आणखी दोघे किरकोळ जखमी केले आहे. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

वीर सावरकर वादानंतर संजय राऊतांचं मोठ विधान

सदर घटना सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत अंबड पोलीस ठाण्यात मद्यधुंद कारचालक साहेबराव दौलत निकम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच पोलिसांनी तात्काळ नियंत्रण कक्षावरून अलर्ट संदेश दिल्याने पोलीसही या कारचालकाच्या मागावर निघाले मात्र तो पर्यन्त त्याने चार जणांना उडवून जखमी केले होते. यात अविनाश प्रल्हाद साळुंके, पंकज शंकर मोरे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नाशिकमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. याबाबत कारचालका विरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास अंबड पोलीस करीत आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारचे १५ महत्त्वाचे निर्णय

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *