Nashik:नाशिक-बेळगाव विमानसेवा पूर्ववत करण्याबाबत सिंधीयांचे भुजबळांना पत्र


वेगवान नाशिक

नाशिकः राज्याचे माजी मंत्री  छगन भुजबळ यांनी विमान कंपन्यांना उडान अंतर्गत किमान 02 वर्षे मुदतवाढ द्यावी अशी मागणी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. याबाबत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. शिंदे यांनी छगन भुजबळ यांना पत्र पाठवून नाशिक विमानसेवा पूर्ववत करण्याबाबत माहिती दिली आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांचे परदेश प्रवासाचे स्वप्न होणार पूर्ण

त्यानुसार नाशिक ते बेळगाव विमानसेवा  जानेवारी 2023 पासून सुरु होणे अपेक्षित असून कोविडमुळे उडान योजनेचा कार्यकाळ पूर्ण न करू न शकलेल्या अलायन्स एअरला उडान योजनेअंतर्गत कालावधी वाढवून देणे विचाराधीन असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य एम. शिंदे यांनी  छगन भुजबळ  यांना पत्राद्वारे दिली आहे.

वीर सावरकर वादानंतर संजय राऊतांचं मोठ विधान

तसेच या दिलेल्या पत्रात भुजबळ यांनी म्हटले होते की, भारत सरकारने टियर वन आणि टियर टू शहरांमधील हवाई संपर्क वाढवण्यासाठी उडान योजना सुरू केली आहे. रिजनल कनेक्टिव्हिटी स्कीम अंतर्गत विविध क्षेत्रांच्या बोलीमध्ये नाशिक एचएएल विमानतळाचाही समावेश करण्यात आला होता. त्यानुसार विविध विमान कंपन्यांकडून नाशिक विमानतळाला ९ शहरांचा पुरस्कार देण्यात आला.

परंतु तीन वर्षांनंतरही विमान कंपन्यांनी आरसीएस उडान 01, उडान 02, उडान 03 मधील बिडिंग दरम्यान प्रदान केलेल्या सेक्टर्समध्ये सेवा सुरू केल्या नाहीत, म्हणून विविध कारणांमुळे उडान योजनेच्या उद्देशाला उजाळा दिला असल्याचे म्हटले आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारचे १५ महत्त्वाचे निर्णय

 

 

 

 


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *