नाशिकः शहरातील महाविद्यालयातील विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी


वेगवान नाशिक

नाशिक: शहरातील गंगापूर रोडवरील एका महाविद्यालयात विद्यार्थिनींमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. सदर घटनेत हाणामारी करणाऱ्या विद्यार्थिनी अल्पवयीन असल्याची माहिती मिळाली आहे.

आजचे राशी भविष्यः या राशीच्या लोकांचे परदेश प्रवासाचे स्वप्न होणार पूर्ण

अधिक माहिती अशी की शहरातील गंगापूर रोडवरील एका महाविद्यालयात चार विद्यार्थिनींमध्ये भांडण झाले असून त्या एकमेकींचे केस ओढताना दिसत आहे. त्यानंतर हा प्रकार  जोरदार मारामारीत सुरू  झाला असून ही फ्री स्टाईल मारामारी कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच  व्हायरल होत आहे.

Nashik:नाशिक-बेळगाव विमानसेवा पूर्ववत करण्याबाबत सिंधीयांचे भुजबळांना पत्र

दरम्यान या घडलेल्या घटनेत मुलींची हाणामारी चालू असताना महाविद्यालयाच्या इतरही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली असून बघ्यांनी फ्रीस्टाईल हाणामारीचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला आहे. मात्र यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

ब्रेकिंग, राहुल गांधी यांना जीवे मारण्याची धमकी

तसेच  महाविद्यालयातच झालेल्या या प्रकारामुळे शिक्षक किंवा कर्मचारी हा सर्व प्रकार घडत असताना कुठे होते असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामुळे आता कॉलेजच्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून सदर महाविद्यालय प्रशासन काय पाऊल उचलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

म्युच्युअल फंडांच्या या नियमांमध्ये होणार बदल


Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *